जैताणे । येथील लोकसेवा वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित पहिला मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे उ्दघाटन खासदार डॉ. हिना गावित व सरकार साहेब रावल यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच ताहीर बेग मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. अँग्लो उर्दू हायस्कूल निजामपूर येथे आयोजित सोहळ्यात दहा जोडपे विवाहबद्द झालेत. त्यांना संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. सामूहिक विवाह सोहळा हा या वाढत्या महागाईच्या काळाला उत्तम पर्याय आहे. तसेच जातीय सलोखा राखण्यासाठी चांगला उपक्रम आहे यांच्यापासून सर्व्यांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन डॉ. हिना गावित यांनी केले.
लोकसेवा वेल्फेअर फाऊंडेशनतर्फे आयोजन
तसेच सरकार साहेब रावल, आ. डी. एस. अहिरे,नबीशेठ पिंजारी यांनी जनतेला संबोधीत केले. कार्यक्रमास हर्षवर्धन दहिते,भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी,सबीरशेठ धुळेकर, दोंडाईचा उपनगराध्यक्ष नबीभाई पिंजारी,भाजपा तालुकाध्यक्ष संजय अहिरराव,नाजीम शेख,हारून हलवाई, जिप सदस्या उषा ठाकरे,पंस सदस्य वासुदेव वाणी,बाजीराव पगारे, सपोनि खेडकर , सरपंच बापु जगताप,सविता जैस्वाल, रहेमान शेख, याकूब पठाण,बलदार पठाण व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आयज अहेमद आयज यांनी तर आभार ताहीर बेग मिर्झा यांनी मानले. यशस्वीतेसाठी लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष रफीक शेख, सचिव अबरार शेख अशपाक शाह मोसीन शाह व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.