जळगाव। तालुक्यातील भादली गावात एकाच कुटूंबात चार जनाची झालेली हत्या माझ्या आयुष्यातील पहिली घटना असून पोलिसांना देखील या मध्ये मोठे आवाहन निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाला सहकार्य करा अशी आर्त हाक जिल्हा पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी दिली आहे. भादली ग्रामपंचायत व पोलीस दलाच्यावतीने ग्रामस्थांनी भोळे कटुंबाच्या झालेल्या सामुहिक हत्याकांडात ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन देण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर, मोक्षदा पाटील उप पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, नशिराबाद पोलिस ठाण्याचे वाघ, एलसीबीचे निरिक्षक चंदेल, पंचायत समिती सदस्य जागृती मिलिंद पाटील, लालचंद पाटील, पंकज महाजन,मिलिंद चौधरी, विजू कावडे, सरपंच उज्वला सुनील बाविस्कर ,गोपाळ ढाके यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनो सहकार्य करा: पोलीस अधिक्षक सुपेकर
पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी आयोजित ग्रामसभेत मध्ये अनेक जणांना पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेत आहे. या शिवाय दुसरा पर्याय नसल्याने निरपराध लोकांना त्रास होत आहे. आपल्याला होत असलेल्या त्रासाची आम्हाला जाणीव आहे. पोलिसांना घाबरण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यातलेच आहोत. आपल्या काही माहिती असल्यास आपल्या लोकप्रतिनिधींना कळविण्याचे अधीक्षक सुपेकर म्हणाले आहेत. पाच दिवस गुन्हा होऊन झाला असताना आरोपी अटकेत नाही. आम्हाला गावकर्यांनी सहकार्य करावे, मोबाईल अथवा चिट्टी ,पत्र लिहून आपण आम्हाला माहिती पुरवू शकतात माहिती देणार्याच्या जीवाची हमी घेतो असे पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी ग्रामसभेत सांगितले.
तपास लागणारच- मोक्षदा पाटील
अमान्य पद्धतीने परिवाराला संपविण्यात आले. मारल्या गेलेल्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली आहे . आपल्याच गावातील कोणीतरी ऐकली असावी मात्र कोणीही माहिती देण्यास पुढे येत नाही या मुळे पोलिसांना तपासात अडचणी निर्माण झाला आहे. दोन दिवसा पासून माझ्या दीड वर्षाच्या मुलाचे तोंड देखील पहिले नाही. दिवस भर आपल्या गावात तपास सुरु आहे. मात्र रात्री जाते तो तेव्हा झोपलेला असतो. मारला गेलेला परिवार हा आपल्याच गावातील आहे. सहकार्य करण्याची भावनिक साद उपपोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ग्रामसभेत ग्रामस्थांना घातली आहे.
पोलीस दलाच्या वतीने 25 हजारावरून 50 हजार बक्षीस पुन्हा जाहीर केले आहे. तर भादली ग्रामपंचायतीच्या वतीने पाच हजार माहिती देणार्याला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नशिराबाद पोलीस ठाण्याचे वाघ यांनी गावाचे दोन डोळे आहेत. आणि पोलिसांचा एक डोळा या मुळे आपल्या सहकार्या शिवाय तपास शक्य नाही. असे या वेळी ग्रामस्थांना उद्देशून म्हणाले. यावेळी पंकज महाजन, लालचंद पाटील, छगन खडसे आदींनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.