सामोडे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना घटसर्फ आजाराची लागण ?

0

विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर प्रशासन सतर्क ; धुळे हिरे वैद्यकीय रुग्णालयात तपासणी

साक्री- साक्री तालुक्यातील सामोडे येथील माधव स्मृती आदिवासी आश्रम शाळेतील एक विद्यार्थिनीचा घटसर्फ आजाराने वेळेवर उपचार न झाल्याने 30 डिसेंबर रोजी मृत्यू झाल्यानंतर अन्य विद्यार्थ्यांनाही या आजाराची लागण होवू नये या पार्श्‍वभूमीवर शाळा प्रशासनाने 94 विद्यार्थ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय तपासणीसाठी गुरुवारी धुळे येथील हिरे वैद्यकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी अहवाल शुक्रवारी प्राप्त झाल्यानंतर पुढील माहिती देणार असल्याचे अधीक्षक मीनाक्षी गजभिये यांनी सांगितले.

आज अहवालानंतर कळणार माहिती
तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळेतील 94 विद्यार्थी विद्यार्थिनींना घटसर्फ या संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याच्या संशयावरून शाळा प्रशासनाच्या वतीने सदर विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याकमी धुळे येथील हिरे वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी विद्यार्थ्यांची तपासणी सुरू असून याबाबतचा सविस्तर अहवाल शुक्रवारी मिळणार असल्याचे रुग्णालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये म्हणाल्या.