पिंपळनेर । सामोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारी पाण्याच्या टाकीजवळ वीस पंचवीस फुटाच्या अंतरावरील पाईप लाईन फुटली आहे. ही पाईप लाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया जात असून ते पाणी खाली यशोदा नगर भागाकडे वाहून जात असल्यामुळे यशोदा नगर व कन्हैयालाल नगर भागात ड्रेनेज ( गटाराची) ची व्यवस्था नसल्याने पाणी साठुन दुर्गंधी येत आहे. त्यामुळे त्यावर डास बसत आहेत त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कन्हैय्यालाल नगर भागात गटारीची व रस्त्यांची मागणी करूनही पूर्तता झाली नाही. अनेकांनी गटारीत सोडावे लागणारे पाणी रस्त्यावर सोडून दिले असल्यामुळे जिकडे तिकडे दुर्गंधी येताना दिसत आहे. तरी गटारी व रस्त्यांची व्यवस्था करून नागरिकांचे होणारे हाल थाःबविण्यात यावे असे नागरिकांत बोलले जात आहे. त्याचबरोबर समोडे चौफुलीवर पाईप लाईन फुटल्याचे दिसत आहे. याकडेही मात्र सामोडे ग्रामपंचायतीने पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.