सामोडे येथे पालक शिक्षक मेळावा

0

पिंपळनेर। आज 22ऑगस्ट रोजी माधव स्मृती आदिवासी आश्रम शाळा सामोडे येथे पालक शिक्षक मेळावा मोठया उत्साह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक यु.एस.माळी होते. प्रमुख पाहुणे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एम. डी. माळी होते.अध्यक्षीय भाषणात माळी सरांनी विद्यार्थ्यांच्या शारिरीक, मानसिक, बौद्धिक विकास कसा होईल या विषयावर मार्गदर्शन केले.

पालकांना विविध विषयांवर मार्गदर्शन
तसेच पालकांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात करण्यात आली. विद्यार्थी विकास कसा होईल यासाठी पालक,शिक्षक या नात्याने आपली भूमिका काय असावी यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व्ही. डी. ठाकरे यांनी केले. सुत्रसंचलन पी. एस. पगारे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक उपस्थित होते तसेच आमशा पाडवी, मागत्या पाडवी, मुरलीधर कुवर, राजाराम गायकवाड, इत्यादी पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन पालक शिक्षक समिती अध्यक्ष गोरख पवार आणि राकेश पगारे यांनी केले .आभार व्ही. डी.ठाकरे यांनी मानले.