जळगाव। जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासात महत्वाची भूमिका बजावत असते. ग्रामीण भागाकरीता राबविण्यात येत असलेल्या सेवा सुविधा तसेच विकासात्मक कामकाज जिल्हा परिषदेमार्फत केले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महत्वांच्या अंगापैकी ती एक आहे.
नुकतीच जळगाव जिल्हा परिषदेची नवनियुक्त कार्यकारीणी जाहीर झाली आहे. बहुतांश विभागात नवीन अधिकारी रुजु झाले आहे. दरम्यान नवनियुक्त मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागाचे कामकाज सायंकाळी 6 वाजेच्या आत उरकवुन कार्यालय बंद करावे असे आदेश दिले आहे. अतिमहत्वाचे काम असेल तरच रात्री उशीरा पर्यत कार्यालयात थांबावे अशा आशयाचे पत्र सर्व विभागांना पाठविण्यात आले आहे. अधिक वेळ कार्यालयात थांबुन राहू नये असे आदेश प्रत्येक विभाग प्रमुखांना दिले आहे.