सायकलचा धक्का लागल्यावरून वाद ; दोघांवर प्राणघातक हल्ला

0

भुसावळातील गडकरी नगरातील घटना ; पाच जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळ- सायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांवर लोखंडी रॉडने मारहाण करून हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास गडकरी नगरात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात पाच आरोपींसह अज्ञात 10 ते 15 महिला-पुरूषांच्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्यात एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. शैलेश सब्रमण्यम कैस्ते (गांधी नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी बाबू उर्फ सुलतान, साहि, रोहित गुप्ता, शफु, डांग्या व अन्य 10 ते 12 अनोळखी पुरूषांसह चार ते पाच महिलांविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

सायकलचा धक्का लागल्याने वाद
फिर्यादीचा मित्र आकाश गवई याची आई सकाळी दुध घेण्यासाठी जात असताना संशयीत आरोपी सुलतानच्या सायकलीचा धक्का लागला. याबाबत आकाश जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर त्याच्यासह मित्र शैलेशवर आरोपींनी लोखंडी रॉड मारून हल्ला चढवला तर या हल्ल्यात आकाशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यास जळगाव येथे हलवण्यात आले आहे. तपास पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज ठाकरे करीत आहेत.