सायकलवरून जात असतांना शॉक लागल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

0

पुणे-सायकल चालवताना विजेच्या खांबाचा शॉक लागल्याने पृथ्वीराज विशाल चव्हाण या ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तो रोजरी शाळेत ६ व्या इयतेत्त शिकत होते. त्याचे वडिल विशाल चव्हाण हे पोलीस पाटील होते. पुण्यातील वारजे माळवाडी येथे आरएमडी महाविद्यालयासमोर सायकल चालवताना या मुलाचा मृत्यू झाला. वारजे माळवडीतील ११ साई सोसायटीमध्ये तो राहात होता.

आज सकाळी १०.३० च्या सुमारास मित्रासोबत आरएमडी महाविद्यालयासमोर असलेल्या सायकल ट्रॅकवर पृथ्वीराज सायकल चालवत होता. त्यावेळी त्याचा विजेच्या खांबाचा शॉक लागला. स्थानिकांनी पृथ्वीराजला मंगेशकर रूग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुणे महानगरपालिकेच्या वतीने बसवण्यात आलेल्या नवीन विजेच्या खांबाजवळ ही घटना घडली.