सायकल चालवण्याच्या वादातून रावेरात एकाच डोके फोडले

0

शाब्दीक वाद विकोपाला; चौघांविरुद्ध गुन्हा

रावेर– लहान मुलांच्या सायकल चालवण्याच्या तक्रारीच्या कारणावरुण एकाचे डोके फोडल्याची घटना शहरातील फत्ते नगर भागात शुक्रवारी घडली. या प्रकरणी रावेर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी फत्ते नगर परीसरात पाण्याच्या टॉकी जवळील भागात लहान मुलांच्या सायकल चालवण्याच्या कारणावरुन सुरू असलेला शाब्दीक वाद विकोपाला गेल्यानंतर हाणामारी झाली. संशयीत आरोपी कुर्बान शेख यांनी कामील यांच्या डोक्यावर पाईप मारून जखमी केले तर शे.शरीफ शे आरिफ व शे.रशीद शे आरिफ तसेच शे.आसीफ शे.हुसेन यांनीदेखील चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली, अशी तक्रार शेख जमील शेख समद यांनी दिल्यावरून वरील चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक ओमप्रकाश सोनी करत आहे.