पोलिसांच्या केले स्वाधीन ; सीसीटीव्ही कॅमेर्यात संशयास्पद हालचाली कैद
जळगाव- शहरातील मु.जे. महाविद्यालयामागील लक्ष्मीनगरात सोमवारी सायकल चोरीच्या संशयावरुन नागरिकांनी एका तरुणाला पकडून रामानंद पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सुनील आनंदा भोई वय 35 रा.पाळधी असे तरुणाचे नाव आहे. तक्रार नसल्याने पोलिसांनी त्याला लेखी समज देवून सोडले असून 5 रोजी पुन्हा पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सुचना केल्या आहे.
15 दिवसांपूर्वी सायकल चोरीची घटना
मू.जे.महाविद्यालयातील लक्ष्मी नगरात विनायका अपार्टमेंट मधून 15 दिवसांपूर्वी रेल्वे कर्मचारी सोनवणे नामक महिलेची 9 हजार रुपये किमतीची सायकल चोरीस गेलेली आहे. ति अद्यापर्यंत सापडलेली नाही. सोमवारी दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास विनायका अपार्टंमेटमध्ये घुसला, इकडे तिकडे बघत होता, फोनवर बोलत होता, ये जा करत होता. यादरम्यान त्याने अपार्टमेंटमधील पडलेल्या सायकलीला उभी केली. महिलेने आवाज आल्याने तो बाहेर पडला. पुन्हा आला. याच अपार्टमेंटमधील अॅड अलका पाटील या महिलेने तरुणाच्या संशयास्पद हालचालींवरुन विचारणा केली, तो उडवाउडविचे उत्तरे देत होता. फोन तपासला असता केवळ कानाला फोन लावलेला होता कुणाचाही बोलत नसल्याचे समजले.
पोलिसांनी लेखी समज देवून सोडले
अपार्टमेंटच्या शेजारील येथील पंकज पाटील यांच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात तरुणाच्या तासभराच्या हालचाली कैद झाल्या. यापूर्वी या अपार्टमेंटमूधन सायकल चोरीला गेल्याने हाच तो चोर असून पुन्हा सायकल चोरण्यासाठी आल्याच्या संशयावरुन येथील प्रा. दिलीप भारंबे, निता गाजेरे, यशवंत गाजरे, प्रमिला पाटील, ज्योती पाटील यांनी तरुणाला रामानंदनगर पोलिस ठाण्यात जावून पोलिसांच्या स्वाधीन केले. तक्रार नसल्याने पोलिसांनी त्याच्या भावाला फोन लावून लेखी समज देवून सोडून दिले. त्याला पुन्हा 5 रोजी हजर राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.