मुक्ताईनगर : शहरातील एका हातमजुरी करणार्या व आयुष्यभरात प्रामाणिकतेच एक ब्रीद निर्माण करणार्या इसमाची उपजिवीका भागविण्यास सहाय्य करणारी सायकल चोरी गेल्याची घटना गत महिनाभरापूर्वी घडली होती. त्यामुळे त्यांचे प्रचंड हाल होत होते. हे पाहून शिवसेना शहर प्रमुखाने मदतीचा हात पुढे केल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे. मुक्ताईनगर शहरातील साई नगरातील रहिवासी देवराम माळी हे मोलमजुरी करण्यासाठी तब्बल 35 वर्षांपासून सायकलीचा अविरत वापर करीत होते.सायकल जुनी झाली तरी जिने आयुष्यभर साथ दिल्याने ती त्यांच्यासाठी जीवनाचा एक भाग बनली मात्र ही सायकल महिनाभरापूर्वी चोरीला गेली होती. यामुळे प्रचंड चिंतेत देवराम माळी होते. ही बाब शिवसेना शहरप्रमुख तथा गटनेते राजेंद्र हिवराळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी माळी यांना भेटून धीर दिला व चक्क नवी कोरी सायकल घेवून दिली. शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र हिवराळे यांनी ज्या उदात्त हेतूने माळी यांची मदत केली त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. माळी यांना सायकल देताना शिवसेना शहरप्रमुख तथा गटनेते राजेंद्र हिवराळे, गणेश पंडित, निलेश चिंचोले, राजेश जुमळे, योगेश जुमळे, गोलू वाघ आदींची उपस्थिती होती.