पिंपरी चिंचवड : हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉपोर्रेशन प्रा. लि. तर्फे इंधन वापराचे महत्त्व समजावे, पर्यावरणाचा समतोल राखावा, यासाठी सक्षम सायक्लोथॉन 2019 या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उत्तम आरोग्य, पर्यावरण रक्षण, आणि इंधन बचतीसाठी सायकल चालवण्याचा संकल्प यावेळी नागरिकांनी केला. 3 हजारहून अधिक नागरिक आणि विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. निगडी प्राधिकरण येथील दुर्गा टेकडी येथील पिसीएमसी वॉटर टँक येथून सायकल रॅलीची सुरुवात झाली. रॅलीतून इंधन बचतीचा तसेच प्रदुषण टाळा असा संदेश देण्यात आला. या सायकल रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त सुभाष डुंबरे, हिंदुस्थान पेट्रोलियमचे श्रीनिवासराव नल्ली, राजेश तुपकर, डी.टी. पाटील, प्रवीण कुमार, एच.पी. गॅस वितरक शिवाजी ढमाळ आणि इतर पिंपरी चिंचवड पुणे येथील सर्व गॅस वितरक आणि कर्मचारी, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपोर्रेशनचे सर्व पदाधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
चांगले वातावरण स्वस्त भारताची प्रतिज्ञा...
हे देखील वाचा
पेट्रोलियम साधनांचा कमीत कमी वापर करून देशाला आवश्यक अशी पेट्रोलियम संसाधने अधिक काळ वापरता येतील. आदर्श नागरिक या नात्याने पेट्रोलियम संसाधनांच्या वापरासंबंधी जागरुक राहून त्याचा निष्कारण वापर आम्ही टाळू. जेणे करून येणार्या नव्या पिढीसाठी एक चांगले वातावरण आणि स्वस्त भारताची निर्मिती होईल, अशी प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली. पिसीएमसी वॉटर टँक – आकुर्डी रेल्वे स्टेशन- डी. वाय. पाटील कॉलेज- भोंडवे कॉर्नर- जगद्गुरु संत तुकाराम महाराज ब्रीज- डांगे चौक- आदित्य बिर्ला हॉस्पीटल – वाल्हेकर वाडी- स्पाईन रोड- संभाजी चौक- भेळ चौक मार्गे पुन्हा पिसीएमसी वॉटर टँक असा या सायकल रॅलीचा मार्ग होता.
एक दिवस सायकल वापराचे आवाहन…
सतीश डुंबरे म्हणाले, इंधनाची बचत केल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. तसेच सायकल चालविल्याने प्रकृती देखील उत्तम राहते. त्यामुळे महिन्यातून एक दिवस केवळ सायकलचा वापर करावा. सक्षम सायक्लोथॉन 2019 यशस्वी करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉपोर्रेशन प्रा. लि. चे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, लायन्स क्लब इंटरनॅशनल (डिस्ट्रीक्ट 3234 डी 2), लियो व लायन्स क्लब पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी, लायन्स क्लब चिंचवड रॉयल, डिस्ट्रीक्टमधील इतर सर्व लायन्स क्लब, इंडो सायलिस्ट क्लब (आयसीसी) यांनी मोलाचे सहकार्य केले.