वसई । विरार ते वसई किल्ला अशी 50 किलोमीटर अंतराची टूर डे वसई सायकल रॅलीमध्ये मुंबई, ठाणे, पुणे खारघर आणि पालघर भागातीत सुमारे 450 सायकलपटूंनी रंगत आणली. अमेय क्लासिक क्लब , सायकल व्हीलेज , फायरफॉक्स , हिरो मोटर्स व आयर्नफिटतर्फे ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती.
विरार पश्चिमेकडील यशवंत नगर येथून निघालेल्या या टूर दे वसई सायकल रॅलीमध्ये प्रथम महापौर राजीव पाटील, पोलिस उपअधिक्षक जयंत भजबळे , सायकलिंग संघटनेच्या अध्यक्षा साधना पाटील, आयर्न मॅन हार्दिक राऊत व असंख्य नगरसेवक तसेच विविध मान्यवर प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. वसई किल्ल्यात काही काळ थांबलेल्या या सायकल स्वारांना दुर्ग अभ्यास श्रीदत्त राऊत यांनी किल्ल्याची ऐतिहासिक माहिती दिली. वसईचे पर्यावरण जपावे. पर्यटनात वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचेदेखील रॅलीला सहकार्य मिळाले होते.