चाळीसगाव – घरी कुणी नसल्याचा फायदा घेवुन दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन घरातील लोखंडी पेटीतील २ लाख रुपये रोख व ५२ हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागीने अज्ञात चोरट्यांनी तालुक्यातील सायगाव येथील घरातुन ६ रोजी रात्री ८ ते ७ रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान लांबलवले असुन मेहुणबारे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील गं.भा विठाबाई दगा साबळे (५५) या परीवारासह गावी गेल्या होत्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कडी कोयंडा तोडुन घरात ठेवलेल्या लोखंडी पेटीचे कुलुप तोडुन त्यातील २ लाख रुपये रोख व सोन्याचे मंगळसूत्र, गळ्यातील पांचाली, नाकातील २ नथ, कानातील बाळ्या, सोन्याचे गुंज व १० भार चांदीचे वेले असा एकुण २ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. आज सकाळी त्यांचे शेजारील लोकांना सदर प्रकार दिसल्यावर त्यांना फोनवर केल्यावर त्यांनी घरी येवुन खात्री केली असता वरील मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी ६ ते ७ रोजी रात्री लांबवल्याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गं.भा. विठाबाई दगा साबळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी मेहुणबारे नुतन स पो नि जयपाल हिरे यांनी जावुन पंचनामा केला आहे.