मुंबई: सध्या बॉलीवूडमध्ये जोरात ट्रेंड सुरु आहे. आणि त्यांना प्रेक्षकांचीही प्रचंड पसंती मिळत आहे. ‘बॅडमिंटपटू’ सायना नेहवाल हिच्या जीवनावर आधारित बायोपिकही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूर ही सायना नेहवालच्या भूमिकेत दिसणार आहे.
https://www.instagram.com/p/BoS5U98lEa_/?utm_source=ig_embed
श्रद्धा कपूरचा स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सायनाच्या भूमिकेतील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत श्रद्धा एकदम सायनासारखी दिसत आहे. बऱ्याच दिवसापासून सायनाच्या बायोपिकची चर्चा सुरू होती. श्रद्धाला सायनाच्या रूपात पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.