गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा 2018च्या बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यांत भारतीय खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या दोघी एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या. या निर्णायक लढतीत सायनाने देशातील अव्वल खेळाडू आणि ऑलंपिक पदक विजेत्या सिंधूला हारवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा 2018 मध्ये भारताने चांगली कामगिरी नोंदवली. भारताने या खेळांमध्ये 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य पदाकांसह एकूण 66 पदकांची कमाई केली.