सायना नेहवालचा भाजपात प्रवेश

0

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सायना भाजपाकडून प्रचार करणार आहे. भाजपाच्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सायना नेहवालचा भाजपा प्रवेश कार्यक्रम पार पडला. दिल्लीतील भाजपा कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. बॅडमिंटनमध्ये भारताची मान उंचावणाऱ्या सायना नेहवालने आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

सायना नेहवालच्या आधी अनेक खेळाडूंनी भाजपात प्रवेश केला आहे. पैलवान योगेश्वर दत्त आणि बबिता फोगाट यांनीदेखील भाजपात प्रवेश केला आहे. १९ मार्च १९९० रोजी हरियाणामधील हिसार येथे सायनाचा जन्म झाला. २३ मे २०१५ रोजी सायनाने भारताची मान उंचावत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला होता. हे यश मिळवणारी सायना नेहवाल पहिली भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू आहे. २०१२ मध्ये सायनाने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवलं होतं. बॅडमिंटनमध्ये पदकाची कमाई करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली होती.

सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित चित्रपटही येणार आहे. अमोल गुप्ते या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून फेब्रुवारीत शुटिंग पूर्ण होणार आहे. परिणीती चोप्रा चित्रपटात सायनाची भूमिका निभावताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी आधी श्रद्धा कपूरचं नाव चर्चेत होतं. पण नंतर परिणीतीचं नाव अंतिम करण्यात आलं.