सायना, साईचे थायलंड विजेतेपदावर लक्ष

0

बँकॉक । 120,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या थायलंड ग्रा प्रि गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बी. साई प्रणित यांचे लक्ष जेतेपदावर आहे. वडिलांच्या आजारपणामुळे सायना नेहवालला नुकत्याच झालेल्या सुदीरमन चषक मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेला मुकावे लागले होते. 2017 च्या प्रारंभी सायनाने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. आता ती जीपीजी स्पर्धेचे आणखी एक विजेतेपद मिळविण्यासाठी आतुरलेली आहे. द्वितीय मानांकित सायना नेहवालचा थायलंड स्पर्धेतील सलामीचा सामना स्लोव्हाकियाच्या रिप्सेका बरोबर होणार आहे.

विजयी लय कायम ठेवण्यास उत्सूक
पुरूष विभागात भारताचा साई प्रणित याला जेतेपदाची संधी आहे. त्याने अलिकडेच सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली असून त्याच्या कामगिरीत सातत्य दिसत आहे. विश्व बॅडमिंटन क्षेत्रात तो आपले अव्वल स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेत साई प्रणितने अंतिम सामन्यात भारताच्या के. श्रीकांतचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. त्याचा थायलंड स्पर्धेतील सलामीचा सामना इंडोनेशियाच्या सुलीस्टियोशी होणार आहे. द्वितीय मानांकित सायनाची सलामी स्लोव्हाकियाची मार्टिना रेपिस्का हिच्याशी होणार आहे.

या सामन्यात विजय मिळवण्यात सायनाला अडचण येईल, असे वाटत नाही. या स्पर्धेत सायना अंतिम फेरीत पोहोचली तर तिला तेथे माजी वर्ल्ड चॅम्पियन रतनाचानोक इंतानोन हिच्याशी तिची लढत होवू शकते. आपला मायदेशातील जोडीदार के. श्रीकांत याला हरवून सिंगापूर ओपनचा किताब जिंकणार्‍या बी. साई प्रणीत या स्पर्धेतही विजयी लय कायम ठेवण्यास उत्सुक आहे. स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात तो इंडोनेशियाच्या नाथानियल अर्नस्टान सुलिस्तयो याच्याविरुद्ध करणार आहे.