सायना, सिंधू राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार

0

हैदराबाद । नागपुरमध्ये नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या राष्ट्रीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील सिनीयर गटाच्या लढतींमध्ये खेळाडूंना विजेतेपद मिळवण्यसाठी घाम गाळावा लागणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ऑलिम्पिकपदक विजेत्या सायना नेहवाल, पी व्ही सिंधू, के श्रीकांत आणि देशातील इतर बडे बॅडमिंटनपटू राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत, असे भारतीय बॅडमिंटन महासंघाचे प्रमुख हिमांता बिस्वा सरमा यांनी सांगितले. प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना सरमा म्हणाले की, अनेक वर्षानंतर सर्व सिनीयर खेळाडू नागपुरमध्ये होणार्‍या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार आहे. भारतीय बॅडमिंटनसाठी ही खूप चांगली सुरुवात आहे. व्यस्त वेळापत्रक आणि काही अडचणींमुळे मागील काही वर्षांपासून सिनीयर खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत खेळत नव्हते. सुपर सिरीज, विश्‍वचषक स्पर्धा आणि इतर काही स्पर्धांप्रमाणे राष्ट्रीय स्पर्धेतली चुरस वाढवण्यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरु आहेत.

जीएसटी परिषदेत सहभागी होण्यासाठी हैदरबादमध्ये आलेल्या सरमा यांनी मुख्य राष्ट्रीय मार्गदर्शक पुलेला गोपीचंद, सायना, सिंधू, श्रीकांत आणि इतर खेळाडूंशी या खेळांच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी सरमा यांनी ग्लासगोमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणार्‍या सिंधू आणि सायनाला अनुक्रमे 10 लाख आणि पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

यावेळी बोलताना सरमा यांनी प्रिमीअर लीग स्पर्धा दोन आठवड्यांषेवजी तीन आठवडे चालणार असल्याचे सांगितले याशिवाय उत्तर, दक्शिण, पश्‍चिम, पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात बॅडमिंटनची पाच केंद्र तयार करण्याची आवश्यकता बोलून दाखवली.