महाड। विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रचंड माहितीचा खजिना घेऊन येणारी सायन्स एक्सप्रेस रायगड जिल्ह्यात थांबणार नसल्याने जिल्ह्यातील विद्यार्थी व शिक्षक या सुवर्णसंधीला मुकणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर धावणारा हा विज्ञानाचा रथ जिल्ह्यातून धावणार असला तरी विज्ञान जगाची अनोखी सफर अनुभवण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना रत्नागिरी व सिएसटी स्थानकावर जावे लागणार आहे. ही सायन्स एक्सप्रेस रायगड जिल्ह्यात थांबावी, अशी पालकांची मागणी आहे. क्लायमेट अॅक्शन स्पेशिअल (डएउअड) या उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्याविज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) पुढाकाराने सायन्स एक्सप्रेसविज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रचंड माहितीचा खजिना घऊन देशातीलविविध राज्यांमधून फिरत आहे.
सायन्स एक्स्प्रेसच्या आठ कोचमध्ये प्रदर्शन
रेल्वेच्या आठ कोचमध्ये हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. विज्ञानातील नव्या गोष्टींची ओळख, पाणी, शेती, जंगल, जैवविविधता, मानवी आरोग्य यांच्यावर हवामानातील बदलांचा होणारा परिणाम, वातावरण, ग्रीनहाऊस गॅस याविषयांची माहिती, ऊर्जेचे महत्त्व, पर्यावरणीय दुष्परिणाम रोखण्यासाठी शालेय पातळीवर, रस्त्यांवर, घर व कार्यालयांमध्ये आणि वैयक्तिक पातळीवरही काय सकारात्मक बदल करता येऊ शकतात याचे पर्याय या विषयी माहिती यात आहे.
1) रेल्वे स्थानकावरून 17 फेब्रुवारीला सोडण्यात आलेली सायन्स एक्सप्रेस 68 स्थानकांत थांबणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ही एक्सप्रेस उपयुक्त असुन या मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रयोग तसेच, विविध वैज्ञानिक साहित्य खरेदीही करता येणार आहे.
2) रत्नागिरी स्थानकावर 14 ते 17 जुलै आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्थानकावर ही एक्सप्रेस 19 ते 22 जुलै दरम्यान थांबणार आहे.
3) रेल्वे मधील हे प्रदर्शन विनामुल्य आहे परंतु रायगड जिल्ह्यात ही एक्सप्रेस थांबणार नसल्याने विद्यार्थी नाराज झाले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालये असून या विद्यार्थ्यांना यलाभ घेणे अवघड होणार आहे.
4) रत्नागिरी व सीएसटी स्थानका दरम्यान रायगडातील स्थानकात ही एक्सप्रेस थांबवावी यासाठी येथील काही पालकांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्वीट केले आहे.