सायन्स गप्पांचे आयोजन

0

पुणे । मराठी विज्ञान परिषद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफीक द एज्युकेशनल रिसर्च (आयसर) आणि गरवारे महाविद्यालय यांच्या वतीने सायन्स गप्पांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. रजनी पंचांग यांच्याशी संवाद साधता येणार आहे. शुक्रवार (दि. 11) सायंकाळी 6.15 वाजता कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. पंचांग समुद्रशास्त्र या विषयावर गप्पा मारणार आहेत. त्यामध्ये समुद्र, महासागर यांची गुणवैशिष्टये, आश्चर्यकारक संरचना आदी गोष्टींबाबत चर्चा करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. तरी अधिकाधिक विद्यार्थी, नागरिक यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे यांनी केले आहे.