रेल्वे प्रवाशांची गैरसोय ; अमृतसरसह हावडा, विदर्भ एक्स्प्रेस केवळ दादरपर्यंत धावणार
भुसावळ – मुंबई विभागातील सायन व कुर्ला दरम्यान पादचारी पुलाचे काम 26 रोजी रात्री 11.30 ते 27 रोजी पहाटे 3.30 वाजेपर्यंत चालणार असून यादरम्यान स्पेशल ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप व डाऊन मार्गावरील तीन रेल्वे गाड्या 27 रोजीसाठी रद्द करण्यात आल्या असून तीन गाड्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनलपर्यंत न जाता केवळ दादरपर्यंत धावणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाने गर्दीच्या हंगामात मात्र रेल्वे प्रवाशांची काहीशी गैरसोय होणार आहे.
या रेल्वे गाड्या रद्द
22101-02 अप व डाऊन मनमाड-मुंबई (राज्यराणी), 12109-10 अप व डाऊन मनमाड-मुंबई (पंचवटी) तसेच 12117-18 अप व डाऊन मनमाड-एलटीटी (गोदावरी) या तीन रेल्वे गाड्या 27 मे रोजीसाठी रद्द करण्यात आल्या आहे तर गाडी क्रमांक 11058 अमृतसर, 12810 हावडा मेल, 12106 विदर्भ या तीन गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनलऐवजी दादरपर्यंत धावतील.