सायबर गुन्हे रोखण्यासाठी सतर्कता

0

वरणगाव । एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे युग आहे. अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल वापरणार्‍यांची संख्यादेखील वाढली आहे. यामुळे ऑनलाईन बँकींग, खरेदी आदींचे व्यवहार देखील मोठ्या प्रमाणावर केले जातात. या माध्यमातून काही भामटे लुबाडण्याचा व्यवसायदेखील करीत आहे. या गुन्ह्यांवर आळा बसावा यासाठी वरणगाव पोलिसांच्या वतीने सायबर क्राईम अंतर्गत घडणारी गुन्ह्यांची जनजागृती व्हावी यासाठी इंटरनेट वापरतांना घ्यावयाची काळजी याबाबत पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून शहरात जागोजागी सर्तकता दर्शविणारे संदेश फलक लावून जनजागृतीचे काम करीत आहे. तसेच नागरिकांना मोबाईल संदेशद्वारे देखील फसवणूकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.

सोशल मिडीयाचे अकाऊंट हॅक करुन हिंसाचार घडविण्याचे प्रयत्न
सध्या अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलच्या कमी झालेल्या किमती व त्यात इंटरनेट सुविधा देणार्‍या कंपन्यामध्ये लागलेली स्पर्धा यामुळे इंटरनेट वापरणार्‍यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. या माध्यमातून माहितीची देवाण घेवाण चटकन होते तर शासनाने देखील विविध दाखले, बँकांचे व्यवहार, फॉर्म भरणे, रेल्वेची तिकीटे यासह इतर सेवा देखील तात्काळ विविध साईडवरुन मिळत आहे. यामुळे अनेकांनी ही सेवा स्विकारत आपले काम घरबसल्या करत असतात. मात्र याच संधीचा फायदा घेवून काही भामटे सायबर क्राईम अंतर्गत बँकेतून पैसे काढुन घेणे, सोशल मिडीयाचे अकाऊंट हॅक करुन त्यावर चुकीच्या माहितीचा प्रसार कण्यासारखे कार करीत आहे. सदरच्या भामट्यांना आपल्या छोट्याश्या चुकीचा फायदा घेत सदचे गुन्हे करीत आहे. याकरीता काही गोष्टींची काळजी घेतल्यास सदरच्या घटना घडणार नाही. यासाठी इंटरनेट वापरताना काही काळजी घेतल्यास अश्या प्रकारच्या घटनांना आळा बसू शकतो. तसेच दहशतवादावरील जनजागृती, एटीएममधील पैसे काढताना घ्यावयाची काळजी, धर्मामुळे निर्माण होणारे तेढ, जातीय हिंसा टाळा सामाजिक सलोखा राखा अशी विविध सुचनांची बॅनर लावण्यात आली आहे. यासाठी वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदिश परदेशी यांनी सार्वजनिक जागी लावली आहे.

या सर्व बॅनरवर आपले कर्तव्य व घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती व चित्रे छापण्यात आली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती होवून संशयित घटनांची माहिती तात्काळ पोलिसांपर्यंत पोहचेल. जेणेकरुन सदरच्या घटनेला आळा घालण्याचा प्रयत्न आहे. तसेच पोलीस कंट्रोल रुमचा नंबरदेखील देण्यात आला आहे.

ग्राम रक्षक दलाची स्थापना
जगदिश परदेशी यांनी पदभार सांभाळल्या पासून नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध उपक्रमांवर त्यांचा भर असून त्यांनी ग्रामरक्षक दल व पोलीस मित्र यांची स्थापना केली आहे. यामुळे वरणगाव शहरासह परिसरातील 27 खेड्यांवर त्यांना लक्ष ठेवणे सोपे जात आहे. तसेच ते तंटामुक्ती समितीच्यादेखील बैठका घेवून गावातल्या गावातच सामोपचाराने तक्रारी मिटवण्यावर भर देणार आहेत.

जागृतीचा प्रयत्न
शहराचा वाढता विस्तार व विकास यामुळे अनेक वेळा छोट्या गोष्टींचे पर्यावसन मोठ्या घटनांमध्ये होत असते. या घटनाना वेळीच आवर घातल्यास पुढील अनर्थ टाळण्यास मदत होते. यामुळे जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून जागोजागी बॅनर लावले असून याबाबत आणखी घराघरापर्यंत पोहचण्यासाठी महाविद्यालयीन तरुण व शाळेतील विद्यार्थ्यांची मदत घेणार आहे.
– जगदिश परदेशी,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, वरणगाव