सायवा विभागीय नृत्य स्पर्धेत जळगावचा संघ प्रथम तर भुसावळ द्वितीयस्थानी

0

ग्रामीण भागातील मुलांच्या कौशल्यांसह कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्पर्धेचे आयोजन

भुसावळ- स्कूल स्पोर्ट्स अ‍ॅण्ड युथ वेलफेयर असोसिएशन (सायवा) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेली उत्तर महाराष्ट्रातील पहिली विभागीय सायवा नृत्य स्पर्धा पाचोर्‍यातील सोनाई लान्सवर झाली. उत्तर महाराष्ट्रातील 140 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा एकेरी, समुह नृत्य प्रकारात घेण्यात आली. त्यात जळगांव प्रथम तर भुसावळ द्वितीय व नाशिक तृतीय क्रमांक पटकवला. या स्पर्धेचे आयोजन ग्रामीण भागातील मुलांना व त्यांच्या कौशल्यासह कलागुणांना वाव मिळण्यासाठी घेण्यात आली होती. 12 वर्षाखालील एकेरी व 12 वर्षावरील एकेरी आणि समूह नृत्याला रोख रक्कम, नोंदणीकृत प्रमाणपत्र व आकर्षक सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले

यांची होती प्रमुख उपस्थिती
या स्पर्धेचा शुभारंभ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व शिंदे अकॅडमीचे संचालक अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. सायवाचे महासचिव निलेश राणे, उत्तर महाराष्ट्र संचालक सुनील मोरे तसेच सायवाचे पदाधिकारी उपस्थित होते. यास्पर्धेसाठी मुख्य परीक्षक म्हणूनदीपक पालखेडकर (नाशिक), वर्षा हरसोले (मुंबई), आयुषी सोनवणे (ठाणे), योगिता काळे (अमरावती) यांनी उत्कृष्ट प्रकारे काम बघितले. या स्पर्धेत नवीन राज्यसचिव, जिल्हाध्यक्ष व सचिवांना नियुक्ती पत्र सायवाचे महासचिव निलेश राणे यांच्या हस्ते चंद्रकांत सैंदाणे, मूर्तजा गिनाह, योगेश पाटील, सायली पालखेडकर, भारती कविटकर, सरीता घाटोळे, विशाखा ओझा यांना प्रदान करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजक सुनील मोरे, सुरेंद्र चौधरी, गीता मोरे होते.