सारंगखेडा यात्रोत्सवात अश्‍वासाठी लागली 11 लाखांची बोली

0

आजअखेर 537 घोड्यांची विक्री ; दिड कोटीपर्यंत उलाढाल

सारंगखेडा : घोडे विक्रीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलमध्ये शनिवारी एका अश्‍वाची तब्बल 10 लाख 82 हजार रुपयांना बोली लागली. देशभरातील घोड्यांचे शौकीन येथे घोडा खरेदीसाठी येतात तर आजवर सिनेक्षेत्रातील अनेक दिग्गज अभिनेत्यांसह अभिनेत्रींनी येथे हजेरी लावल्याचा इतिहास आहे. यायात्रोत्सवात शनिवारी दिवसभर 35 घोड्यांची विक्री झाली तर आजअखेर सुमारे दिड कोटी पर्यंत उलाढाल झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.