सारंगखेडा येथे एकलव्य जयंतीनिमत्त मिरवणूक

0

शहादा । सारंगखेडा ता. शहादा येथे वीर एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. प्रथम वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर गावात सजवलेल्या ट्रँक्टर वर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत टेंभे, कळंबू, अनरद, तोरखेडा, कुकावल परिसरातील आदिवासी बांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपारिक वेशभूषा परिधान करून ढोल ताशांचा गजरात गावातील आदिवासी वस्तीपासून मिरवणुकीस सुरुवात केली. याप्रसंगी मान्यवरांनी आदिवासी संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी समाजाने संघटीत होवून समाजाचा विकासासाठी योगदान द्यावे. शिक्षणावर भर द्यावा युवकांनी व्यसनाचा अधीन होऊ नये त्यासाठी जागृती आवश्यक आहे असे आवाहन केले. कार्यक्रम व मिरवणूक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कैलास सोनवणे, रणजीत भिल, पंकज मालचे, दिलीप सोनवणे, प्रवीण वळवी, भारत सोनवणे, पिंटू पाडवी, सागर सोनवणे, संतोष वळवी सह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त लावण्यात आला होता.