अश्वयात्रेला ब पर्यटनस्थळाचा दर्जा ; राज्य शासनाकडून साडेचार कोटींचे अनुदान ; महिनाभर चालणार फेस्टीवल
शहादा (बापू घोडराज)- महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमाने सारंगखेडा येथील प्रख्यात एकमुखी दत्ताच्या अश्व यात्रेला ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला असून यंदाच्या चेतक फेस्टिवलला साडेचार कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. चेतक फेस्टिवल हा देशातील महत्वाचे महोत्सव व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. 12 डिसेंबरपासून यात्रेस प्रारंभ होत असून यात्रेचा कालावधी महिन्याचा करण्यात आला आहे. पूर्ण महिनाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. फेस्टिवल दर्जेदार ठरून देशभरातील पर्यटक व अश्व प्रेमीं लाखोच्या संख्येने भेट देण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या सर्व सुविधांची जय्यत आयोजकांनी केली आहे.
यंदापासून महिनाभर यात्रोत्सव
पुरातन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सारंगखेडा यात्रा हि आधी 15 दिवसांची भारत होती. यंदाच्या वर्षापासून ती एक महिन्याची करण्यात आली आहे. यात्रेची सुरुवात दत्त जयंती च्या दोन आठवडे अगोदर पासून करण्यात आली असुन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत चेतक फेस्टिव्हल चे उद्वघाटन अधिकारी, पञकार व ग्रामस्थांच्या नगण्य उपस्थित करण्यात आली असली 22 डिसेंबरपासून खर्या एकमुखी दत्ताच्या यात्रेला प्रारंभ होणार आहे. सुमारे चार लाख भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. याच दिवशी दत्ताची भव्य पालखी ही निघणार आहे.
प्रशस्त राजेवाडी प्रवेशद्वार
चेतक फेस्टिवलच्या प्रांगणात प्रवेशासाठी पश्चिमेला व दक्षिणेला दोन प्रशस्त प्रवेश प्रवेशद्वार बनविण्यात आले आहेत. या प्रवेश द्वारांची रचना प्रशस्त किल्याच्या प्रवेशाद्वारासारखी करण्यात आली असल्याने आपण एखाद्या भव्य भुईकोट किल्याच्या परिसरात प्रवेश करतो आहे, असे वाटते. सदर प्रवेशद्वार प्रथमदर्शनी मोहक वाटत असल्याने ते आकर्षणाचे केंद्र झाले आहे.
प्रशस्त धावपट्टी व व्ही.आय.पी. दर्शक दीर्घा
घोड्यांच्या शर्यतीसाठी व त्यांच्या परीक्षणासाठी अश्व बाजाराच्या मधोमध रुंद अशी प्रशस्त धावपट्टी तयार करण्यात आली आहे तर धावपट्टीच्या दोन्ही बाजूला सुरक्षेचे कठडे लावण्यात आले आहे तर यात्रेकरूंना ते सहज पाहता यावे या साठी दर्शक दीर्घा तयार करण्यात आल्या आहेत. येथे उभे राहून अश्व शर्यती पाहता येणार आहेत तर व्ही. आय.पी.पर्यटकांच्या सोयीसाठी काचेच्या वातानुकुलीत दर्शक राहुट्या बनविण्यात आल्या आहेत.
अश्वकला पव्हेलीयन
यात्रेत अश्वांच्या विविध करतबी पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरते या अश्वकलेचा आनंद घेता यावा यासाठी प्रशस्त अश्वकला पव्हेलीयन उभारण्यात आले आहे. येथे बसून दररोज घोड्यांच्या विविध करतबी पाहता येणार आहे. तसेच विविध अस्सल प्रजातीच्या 25 घोड्यांचे प्रदर्शनही एका वेगळ्या ढंगात ठेवण्यात आले आहे. त्याच प्रमाणे अन्न छत्रासाठी सुसज्ज राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. यंदाच्या वर्षी यात्रेत महिलांसाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी स्वतंत्र पंडाल उभारण्यात आले आहे.
अश्व छायाचित्र प्रदर्शन
जगभरातील विविध घोड्यांच्या प्रजातींचा पर्यटकांना परिचय व्हावा, घोड्यांची परिपूर्ण माहिती पर्यटकांना व्हावी या साठी येथे छायाचित्र प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. यात जगातील नामवंत अश्व छायाचित्रकारांनी काढलेले छायाचित्रे ठेवण्यात हेणार आहे.
शिवकालिन शस्त्रांचे प्रदर्शन
यात्रेत येणार्या भाविक व पर्यटकांना शिवकाळात युध्दात वापरली जाणारी शस्त्रे भाला, तलवारी , ढाल, गुप्ती सह विविध प्रकारचे शस्त्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.