सारसोळेतील बामनदेव मंदिर सरकारच्या रडारवर

0

नेरुळ । सारसोळेतील खाडीअंतर्गत असलेले बामन देव मंदिर हे शासनाच्या रडारवर आलेले असून;फॉरेस्ट डिपार्टमेंटने या मंदिरास नोटीस बजावलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार वन विभाग (कांदळवन) प्रशासनाने सारसोळे खाडीअर्ंतगत भागात असलेल्या आपल्या बामणदेवाच्या मंदिरास अनधिकृत घोषित केले आहे. याबाबत हरकती व पुरावे याबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी दि. 17 सप्टेंबर सारसोळे गावातील दत्त मंदिराजवळ सभेचे आयोजन करण्यात आले आहे.याबाबत हे मंमंदिर जर अनधिकृत म्हणून घोषित करून तोडणार असेल तर ते सारसोळे ग्रामस्थ होऊन देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

…तर आम्ही शांत बसणार नाही
खाडीअंतर्गत भागात बामणदेव मंदिर असलेले हे मंदिर पुरातन असून सिडको, नवी मुंबई अस्तित्वात नसताना हे मंदिर खाडी किनारी आगरी कोळी बांधवांनी वसवलेले आहे. इतक्या वर्षांत कधीही याबाबत कांदळवनात मंदिर आहे म्हणून आजपर्यंत कोणत्याही प्रशासनाने मंदिराबाबत नोटीस पाठवली नव्हती. या मंदिराबाबत आमच्या आगरी-कोळी बांधवांच्या भावना जोडलेल्या आहेत. इथे मिठागरे होती तेव्हापासून हे मंदिर आहे. पिढ्या न पिढ्या या मंदिराची पूजा केली जात आहे. मात्र, अचानक फॉरेस्ट डिपार्टमेंट जर अनधिकृत हा ठपका ठेवून नोटीस पाठवणार असेल तर याबाबत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा सारसोळे गावचे नागरिक मनोज मेहेर यांनी दिला आहे.