साराचा ‘सिंबा’च्या सेटवरील स्टंट करतानाचा फोटो वायरल

0

मुंबई ­: सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. केदारनाथ पाठोपाठच ती ‘सिंबा’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

चित्रपटात एक स्टंट करतानाचा फोटो साराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत साराने रोहित शेट्टीची हिरोइन असे कॅप्शनही दिले.

या चित्रपटासाठी चित्रपटाची पूर्ण टीम खूप उत्साहित आहे. ही टीम अनेकदा सेटवरचे फोटो शेअर करत असते. सिंबा चित्रपटात अजय देवगणही काही वेळासाठी भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.