सारोळ्याच्या इसमाचा सर्पदंशाने मृत्यू

Sarola Old Man Died Of Snakebite मुक्ताईनगर : मजुरी काम करण्यासाठी शेतात गेलेल्या सारोळा येथील शिवाजी विठोबा चव्हाण (75) या वयोवृद्धाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला.

मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
30 जुलै रोजी ही घटना घडल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान 4 ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मुक्ताईनगर पोलिसांकडे कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक अविनाश पाटील करीत आहेत.