सार्वजनिक उर्दू हायस्कूलमध्ये वह्या व शाळेचा गणवेश वाटप

0

नवापुर। नवापुर शहरातील सार्वजनिक उर्दु हायस्कुल व नँशनल उर्दु हायस्कुल येथे विद्यार्थीना वहया व शाळेचा गणेश वाटपाचा कार्यक्रम जमीअते उलमा -ए-हिंद नवापुर तर्फे करण्यात आला.

यावेळी जमीअते उलमा- ए- हिंद चे सरपरस हाजी मुसाजी व्होरा.हाजी सोहेब मांदा,हाजी इम्तियाज लखानी, हाजी सोहेल जनतावाला,युसुफ कायदावाला, मौलाना रऊफ मनियार,रऊफ शेख, पमा.सैय्यद,इसुफ फुटवाला,हाजी राशीद शेख, इमतियाज वालोडीया,रसुल पठाण,इजु खाटीक, अबजल पठाण,इकबाल पठाण,फारुक शेख सार्वजनिक गुजराथी हायस्कुलचे मुख्याध्यापक संजय जाधव,साकीर शेख आदी उपस्थित होते. यावेळी रऊफ शेख म्हणाले की गरीब व गरजु विद्यार्थीना फि,गणवेश,वह्या पुस्तकेसाठी जमयत अलमाहीन नवापुर ही सहकार्य करणार आहे. याचा शिक्षणात उपयोग घेऊन आपले उज्वल भविष्य घडवा. यानंतर प्रा.पमा सैय्यद म्हणाले की विद्यार्थी हे आपले भविष्य आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.कलाम तसेच माजी शिक्षण मंत्री डॉ.जाकीर हुसेन यांचा कार्यशैलीची प्रेरणा घेऊन मोठे धैर्य निश्चित करा असे सांगितले. यानंतर नॅशनल उर्दु हायस्कुल चा आवारात उपस्थित मान्यवराचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.