सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात आंदोलन

0

धुळे। सार्वजनीक क्षेत्रातील बँकांनी खाजगीकरणाला विरोध करीत आपल्या विविध मागण्यांसाठी आज युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियनतर्फे संप पुरकाण्यात येवून आज आंदोलन करण्यात आले. देशभरातील नऊ युनियन व दहा लाख कर्मचारी, अधिकार्‍यांनी हा संप पुकारला असून धुळ्यातील सार्वजनीक बँकांनीही सहभाग घेतला आहे. जिल्हा परिषदेसमोरील एस.बी.आय.बँकेच्या समोर आज आंदोलन करण्यात आले. ठेवीदारांच्या ठेवी वाचविण्यासाठी खाजगीकरण नको. खाजगीकरणझाले तर बँकांचे मालक मोठे उद्योगपती असतील म्हणून सामान्य माणसांच्या हितासाठी खाजगीकरण नको.

सामान्यांच्या हितासाठी संप
लहान बँकांचे मोठ्या बँकेत विलीनीकरण करून सरकारला फक्त 5/6 बँकाच ठेवायच्या आहेत. त्यामुळे सामान्य ठेवीदार द्विधा मनःस्थितीत आहे. म्हणून बँकांच्या विलीनीकरणाला विरोध दर्शवित हा संप पुकारण्यात आला आहे. थकीत कर्जाच्या बाबतीत सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात, वेतन कराराची अंमलबजावणी वेळेत करावी या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला असून हा संप सामान्य माणसांच्या हितासाठी आहे. तसेच ग्राहकांना होणार्‍या गैरसोयीबद्दल युनाटेड फोरमच्यावतीने दिलीगीरी या संपादरम्यान व्यक्त केली आहे. यावेळी युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन (धुळे-नंदुरबार जिल्हा) चे अध्यक्ष संजय गिरासे, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सुहास खाडिलकर, नरेंद्र वडनेरे, हेमंत कुळकर्णी, एल.एम.जोशी, प्रमोद वेल्हणकर, भीमराव जाधव, किशोर चंद्रात्रे, कैलास दलाल, शिवाजी भामरे, प्रदीप पाटील, मोहन महाले, लक्ष्मण जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.