जळगाव: आठवड्याभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. तयारी अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. दरम्यान आज मंगळवारी जळगाव जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक संपन्न झाली. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, किशोर भोसले, ललित चौधरी, धनंजय चौधरी, किशोर देशमुख, हेमंत महाजन, सुरज दायमा, दीपक जोशी, अजिंक्य देसाई आदी समन्वय बैठकीला उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक श्री.शिरसाठ यांनी केले.
बैठकीत उत्सवाची पावित्रता जपत अतिशय शिस्थित उत्सव साजरा करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी बैठकीत गणेशोत्सवाबाबतच्या जळगाव पटर्नचे महत्व सांगितले. महापालिका प्रशासनाने मुख्य मार्गाची दुरुस्ती करावी, प्रभागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी याबाबत सूचना करण्यात आल्या.पोलीस प्रशासनाला मदत कक्ष उभारण्याबाबत सूचना करण्यात आल्या. जिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिकेसह आरोग्य सुविध पुरविण्याबाबत सूचना करण्यात आल्या.