पुणे । शहराच्या दक्षिण भागातील विधायक उपक्रम राबविणार्या मंडळांसाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री शारदा गजानन सार्वजनिक गणेशोत्सव स्पधेर्चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश घुले यांनी दिली.
मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब कोंडे, कार्याध्यक्ष संजय साष्टे, कामगार युनियने संतोष नांगरे, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, राजेंद्र कोरपे, राजेश मोहोळ, गणेश यादव, राजू पठारे, वसं तराव तोडकर आदी याप्रसंगी उपस्थित होते. यामध्ये सार्वजनिक उपक्रम, समाजप्रबोधन, उत्कृष्ठ देखावे आदी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणार्या मंडळास 51 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. मंडळांसाठी पाच आणि सोसायट्यांतील मंडळांसाठी पाच अशी 10 उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येणार आहेत.