सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा

0

पुणे : स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊन शहरातील सर्व वैद्यकीय संघटना, डॉ. गणेश राख आणि जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातून ’बेटी बचाव’चा संदेश देणार्‍या गणेशोत्सव देखाव्यांची स्पर्धा आयोजिली आहे.

जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेशोत्सव अशा दोन विभागात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत विनामूल्य सहभाग घेता येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गटात प्रथम क्रमांकाला 51 हजार, द्वितीय क्रमांकाला 31 हजार, तर तृतीय क्रमांकाला 11 हजार रुपयांचे पारितोषिक असेल. गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक या गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे 21 हजार, 11 हजार व 7 हजार असे पारितोषिक असेल. घरगुती गणेशोत्सव विभागात 11 हजार, 7500, 3500 असे पारितोषिक असणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागासाठी मंडळाची, घरगुती गणेशोत्सवाची संपूर्ण माहिती 15 सप्टेंबर 2018 पर्यंत 7350874444 या क्रमांकावर पाठवावी. अधिक माहितीसाठी 9075036666 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.