जळगाव:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल चार महिने व्यापारी संकुल बंद होते. बुधवारपासून अटी-शर्तीवर उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, उपायुक्त संतोष वाहुळे यांनी फुले मार्केटसह सुभाष चौक,राजकमल चौक,बळीराम पेठेत पाहणी केली. पाहणी दरम्यान, काही दुक ानांमध्ये गर्दी दिसून आली. त्यामुळे 13 दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली. त्याचवेळी चार जणांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकतांना दिसून आले. त्यामुळे उपायुक्त वाहुळे यांनी त्या चार जणांवर प्रत्येकी 500 रुपये दंडात्मक कारवाई करुन त्यांना थुंकी साफ करण्याची शिक्षा सुनावली. तसेच विना मास्क 20 जणांवर देखील प्रत्येकी 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
13 दुकाने सील
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्याचे वारंवार आवाहन क रण्यात येत आहे. तरी देखील गर्दीवर नियंत्रण होतांना दिसून येत नाही. चार महिन्यानंतर दि. 5 ऑगस्टपासून शहरातील सर्व प्रमुख व्यापारी संकुल अटी- शर्तीवर चार दिवस उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी संकुल पून्हा गजबजले आहेत. दरम्यान,उपायुक्त संतोष वाहुळे यांनी फुले मार्केटसह सुभाष चौक,राजकमल चौक,बळीराम पेठेत पाहणी केली असता गर्दी दिसून आली. त्यामुळे शहरातील 13 दुक ाने सील करण्याची कारवाई केली. यात स्पोलो मोनिया, कृष्णा इपोर्टेड हाऊस, टिप टॉप वेअर्स,खैरनार ऑप्टीक, कन्हैया स्वीटस,विसपुते ज्वेलर्स,पार्थ ज्वलर्स, खोंडे बंधु सोनेचांदी, मीरा ज्वेलर्स, न्यु बागुल ज्वलर्स,मनिष अलंकार या दुकानांचा समावेश आहे.
मास्क न वापरणार्या 20 जणांवर कारवाई
फुले मार्केटसह सुभाष चौक,राजकमल चौक,बळीराम पेठ,सराफ बाजार, गणेश कॉलनी या ठिकाणी उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथकाने पाहणी केली. पाहणी दरम्यान मास्कचा वापर न करणारे निदर्शनास आले. त्यामुळे 20 जणांवर प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली.