सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या वाहनांवर कारवाई, चालकांवर गुन्हे

0

उल्हासनगर । सार्वजनिक रोडवर हातगाडी उभी करून जाणा-या येणा-या लोकांना धोका किंवा ईजा निर्माण होईल अशा स्थितीत हातगाडीवर खाद्यदपदार्थांची विक्री करणा-या दोन हातगाडी चालकांविरुध्द विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कॅम्प नं. 4 येथील श्रीराम टॉकीज जवळील सार्वजनिक रोडवर हातगाडीवरील सॅन्डवीज पदार्थाची विक्री करणा-या शाम प्रजापती(39) व रवि शेट्टी(37) याच्याविरूध्द विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापुर पश्‍चिम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बदलापुर पश्‍चिम येथील रेल्वे स्टेशन समोरील वल्हारी कपडयाच्या दुकानासमोर रहदारीच्या सार्वजनिक रस्त्यावर बंटी(38) या टॅम्पो चालकाने टॅम्पो उभी करून ठेवल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी घटना मेन बाजारपेठ देवधर मार्किटसमोर सार्वजनिक रोडवर घडली. दत्तात्रेय(39) याने टॅम्पो उभी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिसर्‍या घटनेत सुनिल(27) या टॅम्पोचालकाने सार्वजनिक रोडवर वाहतुकीच्या ठिकाणी टॅम्पो उभा करून ठेवल्याने गुन्हा दाखल केला आहे.