जळगाव। जिल्हा परिषदेने सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या थकीत वीजबीलापोटी 10 कोटी 38 लाख रूपयांचा धनादेश महावितरणकडे सुपुर्द केला आहे. जळगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय आकोडे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता एस.बी.नरवाडे यांचेकडून धनादेश स्वीकृत केला. जळगाव जिल्हा परिषदेच्या 14 सार्वजनिक पाणी पुरवठा उच्च दाब ग्राहकांची मागील 8 ते 10 वर्षापासून वीजदेयकांची थकबाकी 13 कोटी 56 लाख 56 हजार 988 रूपये आहे.
थकबाकी आणि चालु वीजदेयक याप्रमाणे
त्यापैकी मुळ थकबाकी 10 कोटी 38 लाख 27 हजार 43 रूपये चा धनादेश जिल्हा परिषदेने महावितरणला दिला. जळगांव परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.ब्रिजपालसिंह जनवीर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अस्तिककुमार पांडेय यांचे आभार मानले आहेत. तसेच मुख्य अभियंता श्री. जनवीर यांनी जळगांव मंडळाच्या अधिकारी-कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे. थकबाकी वसुलीच्या मोहिमेत सातत्य ठेवण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.थकीत वीजबील असलेल्या 14 सार्वजनिक /प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या मुळ थकबाकी व चालु वीजदेयकाचा भरणा जिल्हा परिषदेकडून करण्यात आला आहे. त्यापैकी 80 गावे हेडवर्क मुक्ताईनगर या योजनेची 4 कोटी 55 लाख 70 हजार 498 रूपये ,सारोळा टी.पी. मुक्ताईनगर योजनेची 1 कोटी 65 लाख 65 हजार 220 रूपये , शेळगांव योजनेची 70 लाख 92 हजार 389 रूपये, आडगांव-जामनेर योजनेची 67 लाख 95 हजार 717 रूपये, तोंडापुर -जामनेर योजनेची 45 लाख 66 हजार 60 रूपये, तामसवाडी योजनेची 36 लाख 65 हजार 602 ,आडगांव-एरंडोल योजनेची 33 लाख 60 हजार 663 रूपये, तामसवाडी टी.पी. -पारोळा योजनेची 32 लाख 28 हजार, कळमडू-चाळीसगांव योजनेची 20 लाख 47 हजार, तामसवाडी/बोळे टी.पी योजनेची 11 लाख 96 हजार 773 रूपये ,गहुखेडा-रावेर दोन कनेक्शनची 4लाख 15 हजार अशी मुळ थकबाकी व चालु वीजदेयकाचा भरण करण्यात आला आहे.