सार्वजनिक रस्त्याचा अनधिकृत खाजगी वापर

0

गुन्हे दाखल करण्याची बंटी जोशी यांची आयुक्तांकडे मागणी

जळगाव– मनपा मालकीच्या सार्वजनिक रस्त्यावर काही व्यापार्‍यांनी खाजगी वापर करुन अतिक्रमण केले आहे.त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक बंटी जोशी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर व्यापार्‍यांनी मोठ मोठे जनरेटर ठेवले आहेत.शेड उभारले असल्याचा आरोप बंटी जोशी यांनी केला आहे.शनिपेठ भागातील सरस्वती डेअरीच्या बाजूच्या गल्लीत सेफ्टीक टँक,जनरेटर,गोडाऊन उभारले आहे.तसेच गल्लीत गेट लावून कुलूप देखील लावले असल्याचे जोशी यांनी निवेदनात नमुद केले आहे. मनपा मालकीच्या रस्त्याचा खाजगी अनधिकृत वापर करण्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी बंटी जोशी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.