सार्वजनिक शौचालयांचा गैरवापर करणार्‍यांवर गुन्हा दाखल करणार

0

जळगाव। शहरातील गोलाणी मार्केट येथे महानगरपालिका आरोग्य अधिकार्‍यांनी शुक्रवार 4 ऑगस्ट रोजी स्वच्छतेची पहाणी केली. मार्केटमधील शौचालय बंद असल्याची तक्रार काही व्यापार्‍यांनी केली होती. यानुसार आरोग्यअधिकारी डॉ.विकास पाटील यांना केलेल्या पाहणीत पहिल्या मजल्यावरी ग. स. सोसायटी समोरील शौचालय कुलूप बंद केलेले आढळून आले. या शौचालयात व्यापार्‍यांने त्याचे दुकानातील सामान ठेवले होते.

त्या व्यावसायिकाला तात्काळ सामान काढण्याची सूचना आरोग्य अधिकार्‍यांनी केली. दरम्यान, आरोग्य अधिकार्‍यांनी जे व्यावसायिक अशा प्रकारे मार्केटमधील शौचालयाचा वापर करीत असतील त्यांनी ते काढून घ्यावे अन्यथा माल जप्त करून संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा दिला आहे. सकाळी वार्ड क्र. 12 दादावाडी येथे स्वच्छतेची पहाणी करण्यात आली. या पहाणीत वार्डांत अस्वच्छता आढळल्याने मक्तेदारास साडे चार हजार रूपयांचा दंड करण्यात आला आहे. आरोग्य विभागातर्फे शहरातील 50 मॅक्रोमपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक पिशवी वापरणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. भाजीपाला विक्रेत, फळविक्रेते यांच्याकडून पिशवी जप्त करण्यात आली.