सार्वजनिक स्वच्छतागृहाअभावी महिलांचे हाल

0

अमळनेर । शहराला लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष लाभूनही त्यांच्या कार्यकाळातच महिलांची कुचंबणा होत आहे. शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शहरासह तालुक्यातील नागिरकांची मोठी गर्दी असते. अनेक नागरिक कार्यालयीन कामांसाठीही शहरात दाखल होतात. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. मात्र शहरात महिलांसाठी प्रसाधन गृहाची कोणतीच सुविधा नसल्याने महिलांचे हाल होत आहे. लघुशंकेला जाण्यासाठी कोणतेही सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आलेले नसल्याने महिला वर्गासह शाळकरी विद्यार्थींनीची मोठी कुचंबणा होत आहे.

महिला नगराध्यक्ष असूनही त्यांनी त्यांच्या कार्यकाळात या बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष केले. तसेच पंचायत समिती सभापती व उपसभापती पदावरही महिला विराजमान आहे. पंचायत समिती व प्रांताधिकारी व तहसील कार्यालयाच्या आवारात असणार्‍या महिला प्रसाधन गृहाला नेहमी कुलूप लावल्याचे दिसून येते त्यामुळे येथे येणार्‍या महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे.