सालदाराला कामावरून काढल्याचा राग ; 35 हजारांच्या केळी खोडाचे नुकसान

0

खिर्डी- सालदाराला शेतातून कामावरून कमी केल्याचा राग आल्याने सालदाराने 35 हजार रुपये किंमतीच्या 700 केळी खोडांचे नुकसान केल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी शेतमालक मधुकर बर्‍हाटे (शिंगाडी) यांनी निंभोरा पोलिसात दिल्यावरून आरोपी लक्ष्मण राजाराम पाटील (शिंगाडी, ता.रावेर) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकरी बर्‍हाटे यांच्याकडे आरोपी लक्ष्मण पाटील हा कामाला होता मात्र सालदाराची गरज नसल्याने त्यांचे काम बंद करण्यात आले व याचा राग आल्याने आरोपी सालदाराने गोलवाडी शिवारातील शेत गट नंबर 99/2 मधील 700 केळी खोड कापून नुकसान केले.