मुक्ताईनगर- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वर सालबर्डी गाव व हॉटेल गीतांजलीच्या दरम्यान एका अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी पहाटे ही घटना घडल्ी. मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध मयताच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अशोक कडलग करीत आहेत.