सालबर्डीत धाडसी घरफोडी ; 53 हजारांचा ऐवज लंपास

0

मुक्ताईनगर:- तालुक्यातील सालबर्डी येथे चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून 53 हजारांचा ऐवज लांबवला. ग्रामीण भागातही चोरट्यांनी डोके वर काढल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. विजय वसंत पवळ (सालबर्डी, ता.मुक्ताईनगर) हे कुटुंबासह घरात झोपले असताना रविवारी रात्री 11 वाजेनंतर मध्यरात्री चोरट्यांनी छतावरून प्रवेश करीत घराचा कडी-कोयंडा तोडून 20 हजारांची रोकड, 28 हजार रुपये किंमतीचे 12 ग्रॅम सोने व पाच हजारांचा मोबाईल मिळून 53 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी पवळ यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय अनिल अडकमोल करीत आहेत.