साळवे, नांद्रे, चावडा यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0

जळगाव । महाराष्ट्र शासनाचे सन 2016-17 चे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये प्रा.सत्यजित साळवे यांना कार्यक्रम समन्वयक प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार, डॉ.सचिन नांद्रे यांना कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार तर पूजा चावडा या विद्यार्थिनीला सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले जातात. 17 जून रोजी हे पुरस्कार राज्य शासनाने जाहीर केले आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम समन्वयक प्रा.सत्यजित साळवे यांना कार्यक्रम समन्वयक प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार जाहीर झाला आहे. दहिवेल ता.साक्री, जि.धुळे येथील उत्तमराव पाटील महाविद्यालयाचे डॉ.सचिन नांद्रे यांना कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार जाहीर झाला. तर अक्कलकुवा येथील आर.एफ.एन.एस.महाविद्यालयाची विद्यार्थीनी पूजा चावडा हिला रुपये दोन हजाराचा सर्वोत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा.एस.टी.इंगळे आदीनी अभिनंदन केले.