गावावर शोककळा ; आज होणार अंत्यसंस्कार
भुसावळ- बोदवड तालुक्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने साळशिंगी येथील 16 वर्षीय तरुणी नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. तब्बल 24 तासांपासून सुरू असलेल्या शोध कार्यानंतर शुक्रवारी सायंकाळी या तरुणीचा मृतदेह नाल्यात आढळल्याने साळशिंगी गावात हळहळ व्यक्त करण्यात आली तर मुलीचा मृतदेह पाहताच आई-वडीलांनी हंबरडा फोडल्याने उपस्थितांनाही गहिवरून आले. विद्या सोपान चौधरी (16) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या आई-वडीलांसह ती शेतातून घराकडे परतत असताना नाल्याच्या पुरात बैलगाडी उलटल्याने ती वाहून गेली होती तर तिचे आई-वडील व भाऊ बचावले होते.