साळशिंगीतील बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह

0

बोदवड : तालुक्यातील साळशिंगी येथील बेपत्ता असलेल्या तरुणाचा तिसर्‍या दिवशी विहिरीत मृतदेह आढळला आहे. उमेश प्रल्हाद चौधरी ( 35) असे मयताचे नाव आहे. 6 रोजी चौधरी हे घरात कोणालाही न सांगता घरातून सकाळी सहा वाजता बाहेर पडले होते व सर्वत्र त्यांचा शोध सुरू होता. बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास साळशिंगी गावाजवळील जलचक्र रस्त्यावरील कालबैले यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला. चौधरी यांनी आत्महत्या केल्याचा संशय असून या प्रकरणी मयताचे काका दिगंबर रामभाऊ चौधरी यांच्या खबरीवरून बोदवड पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार निकम करीत आहेत.