साळसिंगीच्या शेतकर्‍याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

0

बोदवड- तालुक्यातील साळसिंगी येथील सुनील दिलीप वाघ (30) या शेतकर्‍याचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. शेतकर्‍याने आत्महत्या केली की अन्य कारणान मृत्यू झाला? याबाबत ठोस काही सांगता येणार नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सोनर्डी शिवारातील विहिरीत सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह आळढून आला. बोदवड पोलीस ठाण्याचे हवालदार संजय भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला. बोदवड पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, आतापर्यंत गल्या दोन महिन्यात तीन शेतकर्‍यांनी कर्जाच्या विवचंनेत आत्महत्येचे पाऊल उचलले आहे.