सावंतवाडी – वेर्ले येथील लग्नासाठी पारगडहून येणार्या वधू पक्षाकडील नातेवाईकांच्या ट्रक्सला आंबोली घाटातील वळणावर समोरून येणार्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रक्समधील आठजण गंभीर जखमी झाले. जखमींवर सावंतवाडी कुटिर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी चंदगड तालुक्यातील तसेच पारगड व दोडामार्ग-सोनावल भागातील आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी 11.30 वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटातील नानाचे पाणी वळणावर घडला. या अपघातात समिधा सत्यवान बेर्डे, नितीन विश्वनाथ देसाई, सुप्रिया नारायण गवस, गौरेश तानाजी वेळीप, सारिका गौरेश वेळीप, नीलिमा नितीन देसाई, शुभांगी सुभाष सावंत , ईश्वर अर्जुन गावड जखमी झाले.