सावखेडासिम ग्रामपंचायत मधील अपहाराच्या कारवाईच्या मागणीसाठी शेखर पाटील यांच्या उपोषणाला महाविकास आघाडीचा रास्ता रोको आंदोलनाव्दारे पाठींबा
यावल ( प्रतिविधी ) तालुक्यातील सावखेडासिम येथील ग्रामपंचायतीस प्राप्त सन २०२० ते २२ पर्यंत च्या विविध निधी वापरातील अनियमिता व अपहार संदर्भात गेल्या दहा महिन्या पासून कारवाईची मागणी करूनही तसेच गेल्या पाच दिवसा पासून पंचायत समितीचे माजी गटनेते (काँग्रेस) शेखर सोपान पाटील व ग्रामस्थांचे गेल्या पाच दिवसापासून येथील पंचायत समितीच्या कार्यालया समोर सुरूअसलेल्या आमरण उपोषण आंदोलनाची प्रशासन दखल घेत नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी सकाळी येथील भुसावळ टी पॉइंट वर महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोखत सुमारे एक तास आंदोलन केले आहे यामुळे तीनही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती
तालुक्यातील सावखेडा ग्रामपंचायत अपहार प्रकरणाच्या संबंधितांवर कारवाईसाठी गेल्या दहा महिन्यापासून पाठपुरावा करूनही तसेच गेल्या पाच दिवसापासून पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील व ग्रामस्थ उपोषण करीत आहेत मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही उपोषणाची प्रकृती खालावली आहे . शुक्रवारी सकाळी महाविकास आघाडीचे वतीने येथील भुसावळ टी पॉइंट वर सुमारे एक तास रास्ता रोको करत धरणे आंदोलने केले आहे. गुरुवारी या संदर्भात तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती यांना निवेदनही दिले आहे . तसेच जळगाव येथील जिल्हा परिषद कार्यालयात उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडील निवेदनाद्वारे मागणी केली मात्र या संदर्भात प्रशासन तातडीने कोणतीही कार्यवाही करत नसल्याने अखेर शुक्रवारी महाविकास आघाडीचे वतीने येथील भुसावळ टी पॉइंटवर रास्ता रोको आंदोलन करत जोरदार धरणे दिली सुमारे एक तास आंदोलनामुळे रस्त्याची तीनही बाजूस वाहनाच्या रांगा लागल्या होत्या अखेर पो.नि.राकेश माणगावकर यांचे मध्यस्थीने प्रशासनाची कारवाई सुरू असल्याचे सांगून आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले उपोषणस्थळी आमदार शिरीष चौधरी,काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर सोनवणे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे खेवलकर यांचेसह अनेकांनी भेटी दिल्या. शहरातील भुसावळ टी पाँईंट वर झालेल्या या रास्ता रोको आंदोलनात यावलचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते,युवक राष्ट्रवादीचे पवन पाटील, आबिद कच्छी , काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे ,काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान , काँग्रेस सोशल मिडियाचे प्रमुख अभय महाजन , उमेश जावळे ,राहुल गजरे,राकेश करांडे,अशफाक शाह, शिवसेना उबाठाचे शरद कोळी,संतोष धोबी ,पप्पू जोशी यांचे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या .